Jay Yash Photo Studio

Jay Yash Photo Studio Jay Yash Studio started on 10 January 2004, we always strive to do our best. We do not compromise.

21/06/2026

कठोर प्रयत्न करत रहा, एक दिवस तुम्ही सर्व ध्येय प्राप्त कराल🤗✊🏻✊🏻🤗


📸"बीड फोटो-व्हिडिओ असोसिएशन" 🤝🤝बीड जिल्ह्यातील सर्व फोटो आणि व्हिडिओग्राफर्स यांचे हक्क, त्यांचे सुरक्षित भविष्य आणि त्य...
03/06/2026

📸"बीड फोटो-व्हिडिओ असोसिएशन" 🤝🤝
बीड जिल्ह्यातील सर्व फोटो आणि व्हिडिओग्राफर्स यांचे हक्क, त्यांचे सुरक्षित भविष्य आणि त्यांच्यातील व्यावसायिक एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी "बीड फोटो-व्हिडिओ असोसिएशन" ची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली आहे.
या असोसिएशनच्या माध्यमातून सर्व फोटोग्राफर्सच्या समस्यांना हक्काचे व्यासपीठ मिळणार असून, व्यवसायाला एक नवी आणि सन्मानाची दिशा देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
असोसिएशनच्या सुरळीत आणि खंबीर कामकाजासाठी खालीलप्रमाणे मुख्य पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे:
अध्यक्ष: शिवरान माने
सचिव: प्रदीप मुजमुळे
कोषाध्यक्ष: विजय नवळे
असोसिएशनच्या उर्वरित कार्यकारणी आणि सदस्यांची निवड लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
नवीन नियम व अटींची अंमलबजावणी!
फोटोग्राफी व्यवसायाला अधिक शिस्तबद्ध बनवण्यासाठी, कष्टाला योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी आणि सर्वांच्या व्यावसायिक हितासाठी काही नवीन नियम व अटी तयार करण्यात येत आहेत.
या नवीन नियमांची अधिकृत अंमलबजावणी आगामी 'जागतिक फोटोग्राफी डे' म्हणजेच १९ ऑगस्ट २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात येईल.
हा लढा आपल्या हक्काचा आहे, आपल्या कलेच्या सन्मानाचा आहे. बीड जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर बांधवांनी एकत्र येऊन या असोसिएशनला अधिक बळकट करावे, हीच नम्र विनंती.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🎉✨
'एकच ध्यास, फोटोग्राफर्सचा विकास!'
'फोटोग्राफर एकजूट, विजय असो!'
MarathiPhotographers UnityIsStrength VideographersBeed PhotographyLife

📸 बीड प्रोफेशनल फोटोग्राफर्स आयोजित “चिंतन मंथन” बैठकीसाठी मनःपूर्वक आभार… 🙏या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी चिंतन मंथन बैठकी...
03/06/2026

📸 बीड प्रोफेशनल फोटोग्राफर्स आयोजित “चिंतन मंथन” बैठकीसाठी मनःपूर्वक आभार… 🙏

या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी चिंतन मंथन बैठकीसाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या, जबाबदाऱ्या मनापासून पार पाडणाऱ्या आणि या कार्यक्रमाच्या यशासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या सर्व प्रोफेशनल फोटोग्राफर मित्रांचे मनःपूर्वक, हृदयपूर्वक आणि अंतःकरणपूर्वक आभार…! ❤️

ज्यांना जे शक्य झाले त्या प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिले…
कोणीतरी नियोजन केले, कोणीतरी व्यवस्थापन सांभाळले, कोणीतरी धावपळ केली, तर कोणीतरी शांतपणे मागे राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला…
आणि म्हणूनच हा कार्यक्रम केवळ एक बैठक न राहता —
तो एकजूट, विश्वास, आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आपल्या फोटोग्राफर कुटुंबाच्या ताकदीचा उत्सव ठरला…! ✨

आपण सर्वांनी मिळून दाखवलेली ही एकता भविष्यातही अशीच कायम राहो…
एकमेकांच्या प्रेमाने, सहकार्याने आणि साथीने आपण फोटोग्राफर बांधवांच्या प्रगतीसाठी, सन्मानासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सदैव खांद्याला खांदा लावून उभे राहू… 🤝📷

या कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानावे तितके कमीच आहेत…
आपले प्रेम, विश्वास आणि साथ हीच आमची खरी ताकद आहे…! 🙏❤️

— बीड प्रोफेशनल फोटोग्राफर्स परिवार

15/05/2026

सर्व फोटोग्राफी इंडस्ट्री विचार करा 😔
#फोटोग्राफर

12/05/2026

Address

Near Yashwantrao Chavan Natyagruha, Canal Road
Bhir
431122

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm
Sunday 10am - 9pm

Telephone

+919922994476

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jay Yash Photo Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jay Yash Photo Studio:

Share

Category