06/04/2022
खरा लढवया ... दिपक भाई केदार आहे
सर्वांनी सहकार्य करायला हवे दिपक भाई ना आपल्या समाजासाठी किती यातना सहन कराव्या लागतात त्यांना कोण करतो इतकं ... आपल आपल्याला होत नाही पण दिपक भाई केदार जे समाजकार्य करत आहेत ते सुत्ती पात्र आहे.. जय भीम 💙🙏🥰💐
काल सिंधी, उमरी, नांदेड येते बौद्ध वस्तीवर भ्याड हल्ला झाला आहे. आज घटनास्थळी भेट दिली, पीडितांची विचारपुस केली, जातीयतेतून हा हल्ला झालेला आहे. बौद्ध ग्रामपंचायत सदस्य संदेश गायकवाड याने येते राजकिय क्रांति केलेली आहे. त्याचा राग सुद्धा येते आहे. राजकीय, जातीय पार्श्वभुमी या प्रकरणाला आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो.
सर्व एफआयआर मधील आरोपींना अटक करावी, काही आरोपींवर दोन वेळा अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही झालेली आहे अशांवर मोक्का लावण्यात यावा. पीडितांना पोलीस संरक्षण द्यावे. संदेश गायकवाड याला कायमस्वरूपी पोलिस संरक्षण देण्यात यावे. गावात तात्काळ जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्त्वात शांतता बैठक बोलवावी. राजकिय दबाव आणून सामाजिक सलोखा बिघडू पाहणाऱ्या प्रवृत्तींवर कार्यवाही करावी. 28 एप्रिल 2022 रोजी भिमजयंती आहे या जयंतीला पोलीस संरक्षण द्यावे या आधी अशा घटना या गावात घडत आलेल्या आहेत, यावर कायमसवरूपी तोडगा काढावा अशी मागणी यावेळी केली आहे.
ऑल इंडिया पँथर सेना इशारा देत आहे तात्काळ सर्व आरोपींना अटक करावी अन्यथा जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात येईल!