04/04/2023
ग्रामपंचायत जुनोनी ता.सांगोला जि. सोलापूर चे पाणीपुरवठा कर्मचारी श्री दगडू लक्ष्मन व्हनमाने यांच्या पत्नी सौ. राजक्का दगडू व्हनमाने यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्यांना डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आहे. डॉ. म्हणाले आहेत की त्यांना जिवंत ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शरीरातील काही निरोगी किडनी खराब झालेल्या बदलून प्रत्यारोपण करणे.यासाठी येणारा खर्च हा खूप आहे.तरी दगडू लक्ष्मण व्हनमाने याची परस्तिथी गरीब आहे.तसेच त्यांच्या कुटुंबात कमविणारे ते एकमेव आहेत.ते ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी असून त्यांना मिळणारा पगार हा अतिशय कमी आहे त्यांचा उदरनिर्वाह होईल इतकाच आहे त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही.
तरि त्यांच्या पत्नी राजक्का दगडू व्हनमाने यांच्या वैद्यकीय उपचारासाठी (किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी) आणि निरोगी जीवन जगण्यासाठी आपण आपल्या सहकार्याने आपल्याला जमेल तेवढी आर्थिक मदत त्यांना करू. आर्थिक मदत तुम्ही समक्ष येऊन त्यांना भेटून करू शकता अन्यथा फोनपे नंबर 8698621720 वर ही करू शकता.ही नम्र विनंती