seenCelebrity7121

seenCelebrity7121 Seen_celebrity7121

25/08/2024

*बिग बॉस मराठी दिवस सत्ताविसावा*

*निक्की अन् अरबाजमध्ये अभिजीतमुळे दुरावा येणार? पाहा प्रोमो*

*‘BIGG BOSS मराठी, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य वर*

*Bigg Boss Marathi New Season Day 27* : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत. गेल्या चार आठवड्यात सदस्यांना 'बिग बॉस मराठी'चा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे. आता घरातील सदस्यांची समीकरणेदेखील बदलत आहेत. त्यामुळे या नव्या सीझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आता अभिजीतमुळे निक्की आणि अरबाज यांच्यात दुरावा येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे. आता 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज निक्कीला म्हणत आहे,"तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही एकमेकांसोबत दिवसभर बोला".

निक्की पुढे अभिजीतला म्हणते,"त्याचं म्हणंन हेच आहे की आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत. तर तू का नाही आहेस?". तर दुसरीकडे अरबाज अंकिताला म्हणतो,"अभिजीत समोर असेल तर कृपया मध्ये येऊ नकोस. आता मी भिडणार". निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला चांगलीच खटकत असल्याचं पाहायला मिळत आहे.


Highlights

Address

Aurangabad

Telephone

+917038647673

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when seenCelebrity7121 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to seenCelebrity7121:

Share

Category