Parivartan Creations

Parivartan Creations Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Parivartan Creations, Event Videographer, Aurangabad.

Parivartan Creation offers Wedding photography, Event photography, Fashion photography/Portfolio's, Movie photoshoot, Photography workshop, Cinema and Portrait photography.

12/07/2026

23/06/2026

PES Voice 158 । नागसेनवन आणि बाबासाहेबांचे अपूर्ण स्वप्न!

​बाबासाहेबांचे अपूर्ण स्वप्न कधी पूर्ण करणार आहात ? पी.ई.एस. वर दावा करणाऱ्या संचालक मंडळांना आणि प्रत्यक्षात काम पाहणाऱ्या प्राचार्यांना आमचा जाहीर सवाल!

छत्रपती संभाजीनगर येथील ज्या पवित्र भूमीला परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "नागसेनवन" हे नाव दिले, त्या भूमीच्या कणाकणात बाबासाहेबांचे विचार आणि स्वप्ने रुजलेली आहेत. आज नागसेनवनात ज्या ठिकाणी "कॉमर्स कॉलेज"' उभे आहे, त्या संदर्भात बाबासाहेबांची एक महत्त्वपूर्ण कल्पना होती, त्या कॉमर्स कॉलेजच्या शेजारी एक भव्य बुद्ध विहार बांधावे आणि त्या ठिकाणी प्रत्येक वैशाख पौर्णिमेला बौद्ध धम्मियांचा भव्य मेळावा भरवावा."

​आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाला ७० वर्षे पूर्ण होत आली आहेत. या ७० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज आम्ही स्वतःला आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर आपला मालकी हक्क सांगणाऱ्या सर्व संचालक मंडळांना व संबंधित प्राचार्यांना एक अत्यंत गंभीर प्रश्न विचारत आहोत "आपण बाबासाहेबांच्या पश्चात त्यांची ही स्वप्ने आणि कल्पना पूर्ण करू शकलो आहोत का?"

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पी.ई.एस. ची स्थापना केवळ शैक्षणिक इमारती उभ्या करण्यासाठी केली नव्हती, तर बौद्ध संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी केली होती. संस्थेच्या अधिकृत घटनेतील खालील कलमे याची साक्ष देतात. ​या कायदेशीर कलमांनुसार (विशेषतः Clause 3b, 3d & 3e), नागसेनवनाच्या आवारात बुद्ध विहार उभारणे, पाली भाषा व बौद्ध साहित्याचा प्रचार करणे आणि धम्म चळवळीला केंद्रस्थान देणे हे पी.ई.एस. प्रशासनाचे 'घटनात्मक कर्तव्य' आहे.

अत्यंत खेदाची बाब अशी की, ज्या नागसेनवनाचा पायाच बाबासाहेबांनी धम्मक्रांतीचे केंद्र म्हणून रचला होता, त्या संपूर्ण नागसेनवनात आजच्या घडीला एकही अधिकृत बुद्ध विहार नाही. या उलट गेल्या काही दशकांत संस्थेच्या अत्यंत मौल्यवान जमिनींवर विविध स्वरूपाची अनधिकृत अतिक्रमणे झाली आहेत. संस्थेच्या हद्दीत इतर अनेक सार्वजनिक व अनधिकृत वास्तू उभ्या राहिल्या, तरीही येथील प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आपली हक्काची जमीन आणि मालमत्ता सुरक्षित ठेवण्यात कायदेशीर अपयश आलेले असताना देखील, सद्यस्थितीतील प्रशासकीय घटकांना याचे कोणतेही भान किंवा खंत नसावी, ही मोठी शोकांतिका आहे. एका बाजूला स्वतःच्या मालकीच्या जमिनींचे रक्षण करता आले नाही आणि दुसऱ्या बाजूला शिल्लक राहिलेल्या शैक्षणिक वास्तू व मैदाने इतर विसंगत कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत, हा दुटप्पीपणा आता थांबला पाहिजे.

​स्वतःच्या हक्काच्या वास्तूंचा गैरवापर होताना उघड्या डोळ्यांनी पाहणारे प्राचार्य आणि आपापसात गटातटाचे राजकारण करून मनमानी कारभार करणारे संचालक मंडळ बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहेत का, हा मोठा प्रश्न आहे.

"सेव्ह पीईएस" चळवळ केवळ व्यवस्थापकीय चुकांवर बोट ठेवत नाही, तर बाबासाहेबांच्या त्या अपूर्ण स्वप्नांची आठवण करून देत आहे. जर शेजारील इतर धर्मीय मिशनरी संस्था आपल्या तत्त्वांशी आणि वास्तूंशी १००% एकनिष्ठ राहू शकतात, तर बाबासाहेबांच्या पी.ई.एस. चे प्रशासन इतके बेजबाबदार का?

​📖 संदर्भ:
१. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सांगाती'
(प्रसंग: माझे औरंगाबादला आगमन : बाबासाहेबांच्या योजना)
लेखक: बळवंत हणमंतराव वराळे

२. Memorandum Of Association Of The People's Education Society, Mumbai (clause 3b, 3d & 3e)



14/05/2026

PES Voice 142 । ICTPES : 2026 । CSN

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या लोगोमध्ये असलेले “प्रज्ञा - करुणा” हे केवळ शब्द नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचे आणि सामाजिक परिवर्तनाच्या व्यापक विचारांचे प्रतीक आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानत पीईएसची उभारणी केली. ज्ञान, मानवता आणि समानतेचा हा वारसा आजही तितकाच प्रेरणादायी आहे.

बांधिलकी सोशल फाऊंडेशन व पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ICTPES : 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून या ऐतिहासिक वारशाला नव्या संदर्भात उजाळा मिळणार असून, पीईएस चा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यावर जागतिक स्तरावर विचारमंथन घडून येणार आहे.

या ज्ञानयज्ञाचा भाग व्हा!
📅 ११ व १२ सप्टेंबर २०२६
📍 छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य, भारत.

आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नावनोंदणी व शोधनिबंधांचे आवाहन !शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाचा वारसा जपत "पीपल्स एज्युकेशन...
14/05/2026

आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नावनोंदणी व शोधनिबंधांचे आवाहन !

शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाचा वारसा जपत "पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या" ऐतिहासिक कार्याला उजाळा देण्यासाठी आणि संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा मार्ग शोधण्यासाठी "बांधीलकी सोशल फाऊंडेशन व पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक विशेष आंतरराष्ट्रीय परिषद!

📌 विषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी : भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य.

​या ऐतिहासिक आणि शैक्षणिक विषयावर आपले विचार मांडण्यासाठी आम्ही विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते यांना आमंत्रित करत आहोत.

​🗓️ ​पेपर सादरीकरणाच्या महत्वपूर्ण तारखा :
• Abstract सबमिशन : ५ जून, २०२६ पर्यंत
• पेपर स्वीकृती : १५ जून, २०२६ पर्यंत
• अंतिम पेपर सबमिशन : १५ जुलै, २०२६ पर्यंत
• नोंदणी (Registration) : १६ ते ३१ जुलै, २०२६
• परिषदेची तारीख : ११ व १२ सप्टेंबर, २०२६

📍परिषदेचे स्थळ :
छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य, भारत.

💰नोंदणी शुल्क:
• ​विद्यार्थी/संशोधक: ₹ १०००/-
• ​प्राध्यापक: ₹ १५००/-
• ​व्यावसायिक: ₹ १८००/-
• ​डेलीगेट्स: ₹ १२००/-
• ​परदेशी उमेदवार: $ 50 USD
​(शुल्कामध्ये कॉन्फरन्स किट, जर्नल, नाश्ता आणि दुपारच्या जेवणाचा समावेश आहे.)

​📧 आपला पेपर येथे पाठवा :
[email protected]

ही परिषद पीईएस समोरील आव्हाने, संधी आणि भविष्यातील दिशा यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि समानतेच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या ज्ञानयज्ञाचा भाग व्हा.

टीप : पेपर इंग्रजी, मराठी, हिंदी या तिन्ही भाषांमध्ये सादर करता येतील.

पेपर सादरीकरणाची मार्गदर्शक तत्त्वे व पात्रता याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.

नोंदणी व ईतर माहिती करीता संपर्क :
9860303216 / 9881556609

03/05/2026

बांधिलकी सोशल फाऊंडेशन व पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "आंतरराष्ट्रीय परिषद: 2026" च्या निमित्ताने परिषद संयोजकांनी सल्लागार समिती सदस्य डॉ. प्रमोद दुथडे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना परिषदेची माहिती पुस्तिका प्रदान केली. यावेळी परिषदेची संकल्पना, उद्दिष्टे व शैक्षणिक दिशादर्शनाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

🗓️ पेपर सादरीकरनासाठी महत्त्वाच्या तारखा :
• सारांश सादर करण्याची अंतिम तारीख: ५ जून २०२६
• पेपर स्वीकृती: १५ जून २०२६
• अंतिम पेपर सादर करण्याची तारीख: १५ जुलै २०२६
• नोंदणी कालावधी: १६ ते ३१ जुलै २०२६
• परिषद दिनांक: ११ व १२ सप्टेंबर २०२६

📌 टीप : पेपर इंग्रजी, मराठी व हिंदी या तिन्ही भाषांमध्ये सादर करता येतील.

📧 पेपर पाठविण्यासाठी ई-मेल : [email protected]

अधिक माहितीसाठी संपर्क करा :
+ 91-9860303216 । + 91-9881556609

09/04/2026

Address

Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parivartan Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Parivartan Creations:

Shortcuts

Share