31/05/2026
“निर्भीड आपली जनता – जनसेवेशी एकनिष्ठ” या प्रतिष्ठित साप्ताहिकाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त मला युवाउद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला, याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो.
हा सन्मान केवळ माझा नसून,आकाश मोबाइल शॉपीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा आहे. व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच ग्राहकांना दर्जेदार सेवा, प्रामाणिक व्यवहार आणि विश्वासार्ह मार्गदर्शन देण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. ग्राहकांचा विश्वास हेच माझ्या यशाचे खरे भांडवल आहे.
आज मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या मेहनतीची पोचपावती असली तरी, यामागे माझे कुटुंब, मित्रपरिवार, सहकारी आणि सर्व ग्राहक यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि विश्वासामुळेच मी व्यवसायात सातत्याने प्रगती करू शकलो.
या सन्मानाबद्दल “निर्भीड आपली जनता – जनसेवेशी एकनिष्ठ” साप्ताहिकाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. हा पुरस्कार मला अधिक जबाबदारीने काम करण्�