Prakash patil photography

Prakash patil photography Hello, Photo lovers and Mind Artist... I am Photographer of this evergreen environment. and I love to Capture Photos....

Thank you sir...
26/04/2026

Thank you sir...

भावपूर्ण श्रद्धांजली सर
26/04/2026

भावपूर्ण श्रद्धांजली सर

भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्राचा सूर हरपला
12/04/2026

भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्राचा सूर हरपला

We salute and respect you...
08/03/2026

We salute and respect you...

शनिवार, दिनांक 22 नोव्हेंबर रोजी चेतना अपंग विकास संस्था आणि इनरव्हील मोमेंट ऑफ कोल्हापूर यांच्या साहित्य विद्यमाने, तसे...
23/11/2025

शनिवार, दिनांक 22 नोव्हेंबर रोजी चेतना अपंग विकास संस्था आणि इनरव्हील मोमेंट ऑफ कोल्हापूर यांच्या साहित्य विद्यमाने, तसेच इनरव्हील ऑफ इंडिया यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त
छत्रपती संभाजी राजे क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे
अपंगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या.

सकाळी अगदी साडेसहाला या स्पर्धांची सुरुवात झाली
आणि त्या क्षणापासून वातावरणात
एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळाच आनंद भरून राहिला.

मी या स्पर्धांचे फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी गेलो होतो.
पण तिथे पोहोचताच मला जाणवलं—
ही केवळ स्पर्धा नव्हती,
तर धैर्य, आत्मविश्वास आणि जगण्याची नवी प्रेरणा घेणारा उत्सव होता.

अशा मुलांचे फोटो काढणे…
हे खरंच एक आव्हानात्मक काम असतं.
कारण हे मुलं कोणत्याही 'पोझ' मध्ये उभे राहत नाहीत,
ते त्यांच्या स्वतःच्या विश्वात मग्न असतात.
त्यांच्या डोळ्यांत निरागसपणा,
चेहऱ्यावर खोडकर हास्य
आणि खेळताना दिसणारी अनोखी चमक—
हे सर्व टिपण्यासाठी कॅमेरापेक्षा
जास्त मनाची तयारी लागते.

नॉर्मल मुलांना आपण काही सूचना दिल्या,
तर ते हवे तसे उभे राहतात, हसतात, खेळतात.
पण या मुलांकडे पाहताच जाणवतं—
त्यांच्यातील प्रत्येक क्षण नैसर्गिक, खरा, आणि अस्पर्शित असतो.

आणि म्हणूनच,
ते त्यांच्या जगात मिसळून
जेव्हा मी त्यांच्यासोबत धावायला लागलो,
हसायला लागलो,
तेव्हा ते मला कॅमेरामागचा माणूस म्हणून नव्हे
तर त्यांच्यातलाच एक मित्र म्हणून स्वीकारू लागले.

आणि त्या क्षणी टिपलेले फोटो…
ते फक्त छायाचित्र नव्हते—
तर भावना, संघर्ष, आनंद, आणि स्वप्नांचे प्रतिबिंब होते.

आज त्या सर्व क्षणांकडे पाहताना
मनात एकच विचार येतो—
ही मुलं अपंग नाहीत,
तर अपूर्व क्षमता असलेली,
खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारी मुलं आहेत.

10/10/2025

INDIA

    #2025   Patil Photography
06/07/2025

#2025 Patil Photography

वारीतील क्षण… कॅमेराच्या डोळ्यातूनजीवनात काही अनुभव असतात, जे केवळ घडत नाहीत, तर अंतर्मनाला भिडतात, अशीच एक अविस्मरणीय अ...
21/06/2025

वारीतील क्षण… कॅमेराच्या डोळ्यातून

जीवनात काही अनुभव असतात, जे केवळ घडत नाहीत, तर अंतर्मनाला भिडतात, अशीच एक अविस्मरणीय अनुभूती म्हणजे 2019 मध्ये केलेली वारी – पुण्यापासून पंढरपूरपर्यंतची ती पायी यात्रा… माझ्या कॅमेरासोबतची!

टाळ-मृदंगाच्या गजरात, विठूनामाच्या उच्चारात, भजनाच्या तानांत माणूस स्वतःला हरवतो आणि विठोबा-माऊलीच्या भेटीत पुन्हा सापडतो.

मी २०१९ साली वारीचा संपूर्ण प्रवास पायी केला आणि त्या प्रवासातील असंख्य हृदयस्पर्शी क्षण मी माझ्या कॅमेरात कैद केले. वृद्ध वारकरींची तल्लीन चाल, पावलोपावली भेटणारी भक्तांची ऊर्जा, भजन म्हणणारे टाळकरी, हरिपाठ करत शिस्तबद्ध चालणारे दिंडीकरी, लहान मुलांचं आनंदात नाचणं – हे सर्व क्षण माझ्यासाठी केवळ फोटो नव्हते, ते भावना होत्या.

ही भावना मी जपली… आणि जिवंत केली ‘रंग वारीचे’ या छायाचित्र प्रदर्शनाद्वारे, जे केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे भरवण्यात आलं होते. प्रदर्शनाला लाभलेली रसिकांची पसंती आणि भावनिक प्रतिसाद मला अधिक जबाबदार बनवत गेला. – हीच माझ्यासाठी खरी पंढरी होती.

आणि आता… २०२५.

पुन्हा एकदा माझ्या पावलांना आणि कॅमेराला तीच दिशा मिळाली – आता मी वारीतील भक्तीरस टिपायला निघतोय...

माझ्यासाठी वारी म्हणजे केवळ एक अध्यात्मिक प्रवास नाही, तर तो "समाजाचे खरे प्रतिबिंब" आहे. त्या धूळभरल्या वाटांवर चालताना माणसामाणसांत भेद नाही, जात नाही, धर्म नाही – असतो फक्त ‘माऊलीचा विठू’.

Address

Kolhapur
416013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prakash patil photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prakash patil photography:

Share