14/06/2026
स्टंटबाजीचा प्रचार करणाऱ्यांनो आता डोळे उघडा..
काल पंढरपूरने अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारणाचा नमुना पाहिला. पंढरपूरच्या लाडक्या नगराध्यक्षा प्रणिता ताई जेव्हा वॉर्डमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गेल्या, तेव्हा तिथल्या काही वैफल्यग्रस्त विरोधी लोकांनी ताईंच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा आणि स्वतः ताईंशी अत्यंत उर्मटपणे बोलण्याचा वाईट प्रकार केला.यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कामाची धमक नसली की माणसं धमक्यांवर उतरतात.
गेली ४० वर्षे पंढरपूरची सत्ता भोगणाऱ्यांनी शहराचा काय विकास केला..पंढरपूरला खड्ड्यात घालण्यापलीकडे कुणी काय केलं हे पंढरपूरच्या जनतेला सर्व माहीत आहे..
सामान्य जनतेला मूलभूत सुविधांसाठी वर्षानुवर्षे वणवण करायला लावणारे तुम्ही आज कोणीतरी प्रामाणिक काम करतय म्हणून त्याला मुद्दामहून आडकाठी आणताय..४० वर्षांत जे तुम्हाला जमलं नाही ते विठ्ठलाच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या विश्वासाने फक्त ६ महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या प्रणिता ताईंनी करून दाखवायला सुरुवात केलीय म्हणूनच आज तुमची पायाखालची वाळू सरकलीय..स्वतः कधी रस्त्यावर न उतरणाऱ्यांना, जेव्हा एक महिला नगराध्यक्ष रस्त्यावर उतरून कामाची गुणवत्ता तपासते, तेव्हा त्यांना स्टंट वाटणारच..जनतेच्या पैशांचा योग्य वापर होतोय का ते बघणं आणि कामाची योग्य पाहणी करणं हा जर स्टंट असेल, तर होय पंढरपूरच्या विकासासाठी हा स्टंट ताई वारंवार करणार..पोटात दुखण्याचं खरं कारण हेच आहे की, ताईंनी ६ महिन्यांत इतकी धडाकेबाज सुरुवात केलीय..आणि हेच तुमच्या ४० वर्षांच्या निष्क्रियतेला उत्तर आहे..तुमचं अपयश झाकण्यासाठी आता तुम्ही विकासकामांमध्ये आडकाठी आणताय..प्रणिता ताई या पंढरपूरच्या जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आहेत. एका महिला नगराध्यक्षांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी उर्मटपणे वागणाऱ्यांनी एक गोष्ट कान उघडून ऐकावी हे नवं आणि बदलेल आणि बदलणार पंढरपूर आहे. इथली जनता आणि आम्ही सर्व कार्यकर्ते ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
तुमच्या धमक्यांना आणि असल्या खोडसाळ राजकारणाला आम्ही अजिबात घाबरत नाही. जेवढी आडकाठी आणाल, तेवढ्याच दुप्पट वेगाने आम्ही पंढरपूरचा विकास करून दाखवू...