15/05/2019
MACCIA तर्फे , *मलेशियामध्ये होणाऱ्या* खाद्य अन्नप्रक्रिया, फळे तसेच सर्व प्रकारच्या
पेय उत्पादनांच्या *भव्य प्रदर्शनास उपस्थित राहण्याची सुवर्णसंधी*
दिनांक 26 ते 28 जून दरम्यान मलेशियात क्वालालंपूर येथे आंतरराष्ट्रीय फळे आणि खाद्य पदार्थ संदर्भातले प्रदर्शन होत आहे . (Food & Beverage Trade Fair). फळे, भाजी, फ्रुटस ऍग्रो- प्रोडक्ट्स व फूड प्रोसेसिंग, व्हेज- नॉन व्हेज फूड, फूड
सप्लीमेंटस, हेल्थ ड्रिंक,
आईस्क्रीम, विविध पेये, वाईन तसेच या संदर्भातले पॅकेजिंग मशीनस , आधुनिक प्रोसेसिंग टेकनॉलॉजी – अशा सर्व बाबींची, डेमो सह माहिती देणारे हे जागतिक स्तरावरचे महत्त्वाचे प्रदर्शन आहे.
जे उद्योजक अन्न प्रक्रिया किंवा कोणत्याही फूड इंडस्ट्रीशी संबंधित असतील त्यांनी मलेशियातल्या या प्रदर्शनात अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर”चे अध्यक्ष संतोष मंडलेचा व ॲग्रो-फुडप्रोसेसिंग कमिटीच्या चेअरपर्सन सुनिता फाल्गुने यांच्या तर्फे करण्यात आलेले आहे.
या प्रदर्शना संबंधी अधिक माहिती www.mifb.com.my या वेबसाईट वर उपलब्ध आहे (20th Malaysian International Food & Beverage Trade Fair - 2019, Kuala Lumpur Convention Centre )
मलेशिया, इंडोनेशिया, तैवान, जपान अशा पूर्वेकडील देशांनी खाद्य पदार्थ आणि खाद्य प्रक्रिया या संदर्भात खूप मोठी प्रगती केली असून फूड व फूड प्रोसेसिंग मधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच तेथे अधिक वापर होतो. फूड प्रोसेसिंगची पद्धत अधिक स्वस्तात आणि अधिक लवकर करण्याच्या मॉडर्न मशिनरीज / खाद्य पदार्थ अधिक काळ टिकवण्यासाठी वापरले जाणारे नवे तंत्रज्ञान , पॅकेजिंग तसेच प्रोसेसिंग यंत्रणेचे अनेक लहान मोठे प्रकार, आंतराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्याची नवी माध्यमे अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात पाहायला / शिकायला मिळू शकतात.
जगात आता ऑरगॅनिक फूडचा अधिक प्रसार होत आहे. आपला देश, उद्याच्या जगाचा अन्न पुरवठादार होऊ शकतो असे मानले जाते. भारतातील *शेतकऱ्यांसाठी आणि खाद्य उद्योगांसाठी ही खूप मोठी संधी आहे*. या शिवाय मलेशिया - इंडोनेशिया अशा देशांमध्ये निर्यातीच्या विविध संधी काय आहेत, हे देखील या प्रदर्शनाच्या निमित्ताने अजमावून पाहता येईल.
आपल्याला माहितीच आहे की ''फूडइंडस्ट्री'' ही जगातली सगळ्यात जास्त वेगाने वाढणारी इंडस्ट्री आहे. ज्या व्यवसायिकाला फूड इंडस्ट्रीमध्ये नवी सुरुवात करायची आहे त्या उद्योजकांसाठी मलेशियातील हे प्रदर्शन म्हणजे सुवर्णसंधी आहे.
तसेच ज्या खाद्य संबंधित व्यवसायिकांना आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये अधिक वेगाने प्रगती करायची आहे, त्यांना देखील हे प्रदर्शन अतिशय लाभदायक आहे.
या प्रदर्शनाची उपयुक्तता लक्षात घेऊन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर यांनी एक विशेष ''कॉर्पोरेट बिझनेस टूर'' आयोजित केलेली आहे. दोन दिवस प्रदर्शनाला उपस्थिती, सायंकाळी फूडप्रोसेसिंग संबंधित प्रशिक्षण, रात्रौ गाला कॉकटेल डिनर तसेच या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातून मलेशियात आलेल्या सर्व खाद्य-पेय संदर्भातील उद्योजकांचे एकमेकांशी नेटवर्किंग असा हा दौरा आहे.
प्रदर्शनानंतर, अंतर्गत नेटवर्किंगसाठी सर्व उद्योजकांना दोन दिवस मलेशियादर्शन आणि खरेदी असा हा पाच दिवसांचा भरगच्च कार्यक्रम MACCIAने आयोजित केलेला आहे.
या अभ्यास /व्यवसाय दौऱ्यासाठी रुपये 65 हजार इतका खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभासदांना किंवा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयाने नॉमिनेट केलेल्या होतकरू उद्योजकांना ह्या रकमेमध्ये थेट 20 हजाराची सवलत मिळू शकते.
म्हणजे *फक्त 45000/- (पंचेचाळीस हजार)* रुपयांमध्ये, MACCIA तर्फे येणाऱ्या उद्योजकांना ,या *मलेशिया दौऱ्याचा* लाभ मिळू शकणार आहे.
अतिशय स्वस्तात होणारा हा प्रशिक्षण आणि अभ्यास दौरा कोणत्याही व्यावसायिकांनी चुकवू नये असाच आहे.
वाया जाणाऱ्या अन्नाचे आणि फळांचे प्रमाण बघता या फळांवर आणि खाद्यावर उत्तम प्रकारे प्रक्रिया होणे गरजेचे आहे. या साठी शासनाच्या अनेक योजना पुढे येत आहेत - महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आता ‘फूडहब’ येऊ घातलेले आहेत.
अशा वेळी खाद्य आणि अन्न पदार्थ प्रक्रिया या संदर्भातल्या उद्योजकांनी तांत्रिकदृष्ट्या अधिक तयार होणे आता आवश्यक झाले आहे. आणि यासाठी भविष्याचा संधींचा विचार करून, मलेशियातील या प्रदर्शनाला व्यवसायिकांनी अवश्य उपस्थिती लावावी.
छोटे मोठे पदार्थ बनवणाऱ्या महिलांनी देखील आपल्या व्यवसाय विस्तारासाठी या प्रदर्शनास अवश्य उपस्थिती लावावी
या दौऱ्याचा कार्यक्रम असा -
दिनांक 25 जून क्वालालंपूरमध्ये आगमन
दिनांक 26 जून खाद्य आणि पेय प्रदर्शनास भेट
दिवसभराच्या प्रदर्शन – भेटी नंतर सायंकाळी खाद्यप्रक्रिया संधी यासंबधी प्रशिक्षण,
उद्योजकांचे एकमेकांशी नेटवर्किंग आणि यानंतर कॉकटेल गाला डिनर
दिनांक 27 जून पुन्हा एकदा मलेशियातील खाद्य-पेय प्रदर्शनाला दिवसभर भेट व जमल्यास मलेशिया चेंबर ऑफ कॉमर्स सदस्यांशी चर्चा.
दिनांक 28 जून मलेशियातील अतिशय प्रसिद्ध अशा गेंटिंग हायलांड या टुरिस्ट स्पॉटला भेट
तसेच उद्योजकांचे एकमेकांशी खेळीमेळीमध्ये नेटवर्किंग
दिनांक 29 जून क्वालालंपूर या शहराचे स्थलदर्शन आणि दुपारी निवांत खरेदी
दिनांक 29 जून रात्रौ पुन्हा मुंबईकडे प्रयाण
महाराष्ट्रातील कोणतेही उद्योजक, मुंबई ते मुंबई 65 हजार रुपयांमध्ये हा दौरा करू शकतात. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभासद मंडळींसाठी किंवा त्यांनी नमूद केलेल्या उद्योजकांसाठी वीस हजाराची सवलत मिळू शकते.
(एका उद्योग समूहातून फक्त दोघांनाच ही वीस हजार रुपयांची सवलत मिळू शकते, एका उद्योग समूहातून दोन पेक्षा अधिक व्यक्तींना इच्छा असल्यास त्यांना रु65000 ही पूर्ण रक्कम भरावी लागेल)
या सर्व दौऱ्यासाठी प्रथम अर्ज करणाऱ्या *फक्त शंभर उद्योजकांना* सवलत मिळणार असून ''फर्स्ट कम फर्स्ट सर्व'' अशी ही संधी असेल, त्यामुळे जर का या दौऱ्याला जायचे असेल तर वेळ अतिशय कमी आहे हे लक्षात घेऊन आजच संपर्क साधा.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर MACCIA
201, Sarda Sankul, M.G.Road, Nashik -422001
Ph. 0253-2577704,
2575053, [email protected]
Mrs. Sunita Phalgune @ *9370050050*
[email protected]
Mrs Rasila Jagdish Kulkarni
*9403774795*
MIFB MIFB is the future of food business. We are the largest Food and Beverage Focused Trade event in the country which offers a platform for businesses from the industry to showcase their products and services at an international level. Exhibitors will be offered a highly focused event which caters