Tushar Photo & Films

Tushar Photo & Films We offer All types of professional photography services. https://buff.ly/4ftJWSb

04/08/2024
Do you want to act? You may not know, but WMFTA is a great place for you! WMFTA has a 3rd batch coming up and there are ...
02/09/2022

Do you want to act? You may not know, but WMFTA is a great place for you! WMFTA has a 3rd batch coming up and there are many positions available. Act your way to fame and glitz!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालपण – Dr. Babasaheb Ambedkar Early Life In Marathiडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्यप्रदेशमध्ये...
14/04/2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालपण – Dr. Babasaheb Ambedkar Early Life In Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्यप्रदेशमध्ये 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे 14 वे अपत्य होते. त्यांचे वडील भारतीय सैन्यात सुभेदार होते आणि त्यांची पोस्टिंग इंदूरजवळील महू येथे होती, जिथे आंबेडकरांचा जन्म झाला. 1894 मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील सातारा येथे स्थलांतरित झाले. काही दिवसांनंतर त्यांच्या आईचे निधन झाले, त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि ते मुंबईला गेले. त्यानंतर आंबेडकरांचे शिक्षण मुंबईत झाले, 1906 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी त्यांचा विवाह 9 वर्षांच्या रमाबाईशी झाला. त्यानंतर 1908 मध्ये त्यांनी 12वीची परीक्षा दिली. आंबेडकरांनी लहानपणापासून अस्पृश्यता पाहिली होती,
ते हिंदू महार जातीचे होते, ज्यांना खालच्या दर्जाचे लोक समजले जात होते आणि उच्च जातीचे लोक त्यांना स्पर्श करणे पाप मानत. त्यामुळे आंबेडकरांना समाजात अनेक ठिकाणी भेदभावाला सामोरे जावे लागले. या भेदभावाला आणि अपमानाला बळी पडलेल्या आंबेडकरांना ते ज्या आर्मी स्कूलमध्ये शिकायचे, तिथे त्यांच्या जातीतील मुलांना वर्गात बसू दिले जात नव्हते. शिक्षकांनीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. इथे त्यांना पाण्याला हातही लावू दिला जात नव्हता, शाळेचा शिपाई त्यांना वरून ओतून पाणी देत ​​असे, ज्या दिवशी शिपाई आला नाही, त्या दिवशी त्यांना पाणी सुद्धा मिळाले नाही. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती)

वाचा – जाणून घ्या बाबासाहेबांचे सुविचार मराठीमध्ये

डॉ. भिमराव आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास (Dr. Babasaheb Ambedkar Education )
प्राथमिक आणि उच्च शिक्षणासाठीही बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला होता. त्या काळी दलित मुलांना शाळेत वर्गात बसण्याची आणि पाणी पिण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे शिक्षणाचा मुलभूत अधिकार मिळवण्यासाठी बाबासाहेबांना अनेक कष्ट घ्यावे लागले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण –
वडील भारतीय सैन्यदलात असूनही आर्मी स्कूल मध्येही त्यांना शैक्षणिक सुविधा मिळाल्या नाहीत. सैन्यदलातील लोकांच्या मुलांना मिळणाऱ्या सवलतींचा त्यांना फायदा झाला. मात्र शाळेत सतत जातिभेदाला सामोरे जावे लागत असे. बाबासाहेबांनी अशा परिस्थितीतही त्याचे प्राथमिक शिक्षण दापोलीत पूर्ण केले. या शाळेत त्यांना वर्गात बसण्याची परवानगी मिळाली नव्हती. पुढे वडिलांसोबत साताऱ्याला गेल्यावर पुढील शिक्षणासाठी बाबासाहेबांनी सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. पुर्वी कोकणातील लोकांमध्ये आडनावे गावावरून ठरत असून त्यापुढे कर लावण्याची पद्धत होती. त्यानुसार त्यांचे नाव आंबवडेकर असे ठेवण्यात आले होत. मात्र उच्चारताना त्रास होत असल्यामुळे पुढे त्याची आंबेडकर अशी नोंद करण्यात आली. साताऱ्यामध्ये चौथीची परीक्षा पास झाल्यावर बाबासाहेब सहपरिवार मुंबईला आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई विद्यापीठातून पदवीधर –
बाबासाहेब १९१२ साली मुंबईतील एलफिस्टन हायस्कुलमध्ये पदवीधर झाले. बाबासाहेब लहानपणापासूनच हुशार आणि बुद्धीमान होते. त्यामुळे ते प्रत्येक परीक्षेत ते नेहमीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असत. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मुंबईत पदवी प्राप्त करणारे बाबासाहेब हे पहिले दलित होते. मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थ शास्त्र आणि राजनिती या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली होती. संस्कृत शिकण्यास विरोध झाल्याने त्यांनी फारसी भाषेतून शिक्षण घेतलं. आंबेडकर मॅट्रिक पास झाल्यावर त्यांच्या ज्ञातिबांधवांनी त्यांच्या कौतुकाचा एक कार्यक्रम केला होता. कारण त्या काळात एका दलित मुलांने एवढे यश मिळवणे ही एक खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळी बाबासाहेबांच्या केळुसकर गुरूजींनी त्यांना स्वतः लिहिलेल्या बुद्धचरित्रातची एक प्रत भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेबांना बुद्धांच्या शिकवणीबद्दल आकर्षण निर्माण झाले. आर्थिक परिस्थितीमुळे बाबासाहेब महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकतील असं त्यांच्या गुरूजींना वाटत नव्हतं. यासाठीच त्यांनी बाबासाहेबांची भेट महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी करून दिली. बाबासाहेबांची हुशारी पाहुन महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. ज्यामुळे पुढे बाबासाहेब मुंबईतील एलफिस्टन येथे शिक्षण घेऊन पदवीधर झाले. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती)

वाचा – बाबासाहेब आंबेडकर शायरी मराठी मध्ये

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कोलंबिया विद्यापीठातून पीएचडी –
बाबासाहेबांना त्यांच्या बुद्धीमत्तेमुळे बडोदा संस्थानात राज्य सरकारने रक्षामंत्री बनवलं मात्र तिथेही त्यांना सतत जातिभेदाला सामोरे जावे लागत असे. सतत होणाऱ्या अशा अपमानामुळे बाबासाहेब जास्त काळ या पदावर काम करू शकले नाहीत. पुढे त्यांना न्युयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून उच्चपदवीसाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी निघून गेले. १९१५ साली बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून समाजशास्त्र, इतिहास, दर्शनशास्त्र, मानव विज्ञान आणि अर्थशास्त्रातून एम ए ची पदवी प्राप्त केली. प्राचीन भारताचे वाणिज्य या विषयावर संशोधन केले. अमेरिकेतून १९१६ साली त्यांनी यासाठी पीएच डी मिळवली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लंडन विद्यापीठातून उच्च शिक्षण –
अमेरिकेतील फेलोशिप संपल्यावर बाबासाहेब पुन्हा भारतात परतले. मात्र येताना ते स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अॅंड पॉलिटिकल सायन्स यात एम.एस.सी. आणि डी.एस.सी. शिवय बार एट. लॉसाठी नोंदणी करून आले होते. भारतात आल्यावर सर्वात आधी त्यांनी प्रथम शिष्यवृत्तीच्या नियमानुसार बडोदा राजदरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराची नोकरी केली. राज्याचे रक्षा सचिव हे पद सांभाळले. मात्र जातिभेदामुळे त्यांना नोकरी करताना खूपच त्रास सहन करावा लागत असे. नोकरी करत असूनही शहरात भाड्याने घर मिळाले नाही. या त्रासाला कंटाळून त्यांनी ही नोकरी सोडून खाजगी शिक्षक आणि अकाऊंटटचे काम सुरू केले. सल्लागाराचा व्यवसायही करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र त्या काळच्या सामाजिक परिस्थितीमुळे तो करता आला नाही. शेवटी ते मुंबईत आले आणि त्यांनी राजनैतिक अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. नोकरी करत असताना ते त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पैसे जमवत होते. ज्यामुळे पुन्हा १९२० साली ते लंडनला पुढील शिक्षणासाठी गेले. १९२१ साली लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अॅंड पोलिटिकल सायन्स मधून त्यांनी मास्टर पदवी प्राप्त केली. पुढे डी. एस. सी. ही पदवीदेखील मिळवली. जर्मनी विद्यापीठीतून डी.एस.सी केले. न्यायशास्त्राचा अभ्यास करून ब्रिटिश बारमध्ये बॅरिस्टर चे काम पाहिले. पुढे ८ जुन १९२७ ला कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैयक्तिक जीवन – Dr. Babasaheb Ambdkar Personal Life In Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १९०६ साली रमाबाई यांच्याशी विवाह झाला होता. रमाबाई आणि बाबासाहेबांच्या यशवंत नावाचा मुलगा झाला. मात्र १९३५ साली रमाबाईंचे एका दुर्धर आजाराने निधन झाले. १९४० साली बाबासाहेबांनाही अनेक आजारांनी ग्रासले होते. मुंबईत या आजारांवर उपचार घेत असताना त्यांची ओळख डॉ. शारदा कबीर यांच्यासोबत झाली. सम विचारांमुळे पुढे त्या दोघांनी विवाह केला. डॉ. शारदा यांनी विवाहानंतर स्वतःचे नाव बदलून सविता आंबेडकर असे केले. डॉ. शारदा यांनी आयुष्यभर बाबासाहेबांच्या आरोग्याची काळजी घेतली. समाजात त्यांना माई या नावाने ओळखले जाऊ लागले.

माहिती स्रोत:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांचे बालपण, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय प्रवास यासोबतच भारतीय बौद्ध ....

08/12/2021

प्रेमाचा करताना झाला झोल,
राहुल्याचा झाला मार खाऊन बट्याबोल

अफलातून प्रेमाची अफलातून मजा
बघायला विसरू नका

लिंक वर जा आणि पहा
Pradeep More Choturam Rahul Kamble RK Amit Sh*tole Faisal Bagalkot Shailesh Satpute Ex Judoka Vijay Jadhav

https://youtu.be/2bS0gG5vaxA

सांगलीतील पोरं थेट भिडनार मद्रास माफियाला. राडा तर होनारच. पहायला विसरु नका आपली मराठी- तेलगु वेब सिरिज MH-10-सांगली कार...
06/07/2020

सांगलीतील पोरं थेट भिडनार मद्रास माफियाला. राडा तर होनारच. पहायला विसरु नका आपली मराठी- तेलगु वेब सिरिज MH-10-सांगली कारण “आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच”

हक्काने शेअर करा आपल्या सांगलीकरांना. लाईक करा, आपला अभिप्राय कळवा आणि हो सबस्क्राईब करायला विसरु नका आपले YouTube चानेल Tushar Entertainment And Media.

लेखन – दिग्दर्शन = दस्तुरखुद्द PMC

कॅमेरा – एडिटींग = तुषार सौंदडे

प्रस्तुतकर्ता = Tushar Entertainment And Media.

लिंक - ( https://youtu.be/imRW3NDqR88 )

This is our upcoming web series promo video. Its represent our Sangli's culture nature of of every citizen. We hope you like our web series. Stay tune with T...

Send messages to any questions.
01/12/2018

Send messages to any questions.

We offer All types of professional photography services.
https://buff.ly/4ftJWSb

05/05/2018

छत्रपती शिवाजी महाराजांचा शासनकाल
महाराष्ट्रात पुण्याजवळ राहणार्‍या हिंदू मराठ्यांनी मुघलांना या भागापासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेतृत्वाखाली स्वतःला विजापूरच्या मुस्लिम सुलतानांपासून स्वतत्र करून घेतले. यानंतर ते अधिक आक्रमक झाले व उत्तरेमध्ये बऱ्याच चढाया करून त्यांनी राज्याचा विस्तार केला. इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराज छत्रपती झाले. महाराजांच्या मृत्यूपर्यंत मराठ्यांनी संपूर्ण मध्य भारत काबीज केला होता. आणि उत्कृष्ट शासन पद्धती मांडली होती.

शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी
१६८१ मध्ये महाराजांचे जेष्ठ पुत्र संभाजी राजे बनले आणि त्यांनी वडिलांची विस्तार करण्याची नीती चालू ठेवली. राजपुत-मराठा एकी होऊ नये आणि दख्खनातील सुलतानांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी औरंगजेब आपल्या सार्‍या राजदरबाराला आणि ५००००० सैन्याला घेऊन दक्षिणेला आला. अपुरे सैन्य व फंदफितुरी असूनदेखील छत्रपती संभाजी महाराजांनी १६८१ ते १६८८ अशी यशस्वी झुंज दिली. या काळात संभाजी महारांजानी एकही किल्ला गमावला नाही की आरमारातले एकही मोठे जहाज मोगलांच्या हाती लागून दिले नाही. जंजिय्राचे सिद्दि, गोव्याचे पोर्तुगीज, मुंबईकर इंग्रज, मोगल या चारही आघाड्यांना हा राजा पुरून उरला वतनदारी मिळवण्यासाठी संभाजी महाराजांच्या काही स्वकीयांनी मोगलांशी हात मिळवणी केली, मोगलांना त्यांची खबरबात दिली आणि १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. त्यांचा प्रचंड शारीरिक छळ करण्यात आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मुत्यूचा परिणाम औरंगजेबाच्या अपेक्षेच्या उलट झाला, मराठ्यांनी शरण न जाता त्यापासून स्फूर्ती घेतली व ते अधिक तीव्रतेने लढू लागले.

छत्रपती संभाजी महाराजांचे बंधू राजाराम हा नंतर राजा बनला. १७०० मध्ये सातारला मुघलांचा वेढा पडला आणि मुघलांनी ते काबिज केले. याच काळात राजारामाचा सिंहगडावर मृत्यू झाला आणि त्याची पत्नी ताराबाई हीने त्यांचा मुलगा संभाजी दुसरा याच्या नावाने राज्यकारभार हातात घेतला. तिने युद्धविरामाचा प्रस्ताव दिला पण बादशाह तयार झाला नाही. त्याच वर्षी मराठे नर्मदेच्या पार पोचले. माळव्याच्या मराठ्यांनी केलेला नवीन हल्ला आणि हैद्राबादमध्ये केलेली लूट यामुळे बादशाह वैतागला. दोन दशके चाललेले दक्षिणेचे युद्ध त्याच्या खजिन्यावर ताण देत होते. १७०५ मध्ये औरंगजेब आजारी पडला आणि दोन वर्षांनी मरण पावला.

बादशहाच्या मृत्यूनंतर शाहूजी जो छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र(म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा नातू) होता त्याला बहादुरशाहने सोडले. यानंतर थोडा काळ अराजकता माजली. शेवटी मराठा नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे याची मदत घेऊन शाहूने निर्विवाद मराठा नेतृत्व मिळविले. बाळाजी आता पेशवा बनला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांची मुघलांबरोबरची लढाई संपुष्टात आली. यानंतर मुघल साम्राज्य हळुहळू खिळखिळे होत गेले आणि मराठा साम्राज्य भारतातील सर्वांत शक्तिशाली राज्य बनले.

१७१३ मध्ये फारूख्सियार मुघल बादशाह बनला. त्याची सत्ता दोन भावांच्या सामर्थ्यावर टिकून होती जे सय्यद बंडा म्हणून ओळखले जात होते. ते अलाहाबाद आणि पटणा येथील राज्यपाल होते. पण बादशहा बरोबर यांचे पटले नाही. सय्यद बंधू आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यातील वाटाघाटीनुसार मराठे बादशाहविरूद्धच्या लढाईत सामील झाले. या वाटाघाटीनुसार मराठ्यांना दक्षिणेत मुघल सत्ता मान्य करावी लागली शिवाय सैन्य व आर्थिक मदतही करावी लागली. याबदल्यात त्यांना एक फर्मान मिळाले ज्यानुसार त्यांना मराठी मातीवर स्वातंत्र्य आणि गुजरात, माळवा इत्यादी सहा वतनांवरील महसुलाचे हक्क मिळाले.

थोरले बाजीराव पेशवे
ते १७३५ मध्ये राजस्थानात, १७३७ मध्ये दिल्ली आणि १७४० मध्ये बंगालपर्यंत पोहचले. पण मराठी राज्य फारच सैल पद्धतीने बांधले होते. दख्खनमध्ये जमा झालेल्या महसुलाचे विभाजन मराठा सरदारांच्यात केल्याने एकी निर्माण झाली. मराठा राज्य आता 'confederacy' बनले. मराठ्यांच्या अधिपत्याखालील भागांची विभागणी ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, माळव्याचे होळकर यांच्यात करण्यात आली. आणि ते मराठी साम्राज्याचे आधारस्तंभ बनले. ताराबाईला बेरारचे महसुल हक्क देण्यात आले आणि नागपूर ही तिची राजधानी बनली.

बाजीराव १७४० मध्ये वारला. शाहूने त्याचा मुलगा नानासाहेबला पेशवा केले. याच वेळी त्याचा भाऊ रघुनाथराव राज्य विस्तार करत पंजाबपर्यंत पोचला. १७६० मध्ये निजामाच्या पराभवानंतर मराठी साम्राज्य कळसाला जाऊन पोहचले.

हि सर्व माहिती विकिपीडिया या संकेतस्थळावरून संकलित केली गेली आहे.

https://mr.wikipedia.org/s/23d

24/03/2018

This film based on India's education. India's government gives us free of cost education but no one can use the facilities.

Address

Plot No. 223, Sangam Society, Behind Sahyadri Starch Company, Kupwad-Miraj Road, Miraj MIDC
Sangli
416410

Opening Hours

Monday 7am - 12pm
Tuesday 7am - 12pm
Wednesday 7am - 12pm
Thursday 7am - 12pm
Friday 7am - 12pm
Saturday 7am - 12pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tushar Photo & Films posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share