14/08/2022
*राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर*
मुंबई, दि. 14: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
*राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.*
*इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:*
*सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील -*
महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभाग
*सुधीर मुनगंटीवार-*
वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय विभाग
*चंद्रकांत पाटील-*
उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य विभाग
*डॉ. विजयकुमार गावित-*
आदिवासी विकास विभाग
*गिरीष महाजन-*
ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण विभाग
*गुलाबराव पाटील-*
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग
*दादा भुसे-*
बंदरे व खनिकर्म विभाग
*संजय राठोड-*
अन्न व औषध प्रशासन विभाग
*सुरेश खाडे-*
कामगार विभाग
*संदीपान भुमरे-*
रोजगार हमी योजना व फलोत्पादन विभाग
*उदय सामंत-*
उद्योग विभाग
*प्रा.तानाजी सावंत-*
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग
*रवींद्र चव्हाण -*
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
*अब्दुल सत्तार-*
कृषी विभाग
*दीपक केसरकर-*
शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग
*अतुल सावे-*
सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग
*शंभूराज देसाई-*
राज्य उत्पादन शुल्क विभाग
*मंगलप्रभात लोढा-*
पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास विभाग